जेजुरी गढावर मुख्य मंदिरा बाहेर डूक्कर मुक्त विहार करताना दिसत होते. त्यांच्या अंगावरही हळद पडली होती. ते काळ्या पिवळ्या टैक्सी सारखे मजेशीर दिसत होते. आत जावून आम्ही दर्शन घेतलं. तिथली ६० किलो ची तलवार पाहीली. मग जरा बाहेर ओसरीत निवांत बसलो. माझा तिथच पसरण्याचा इरादा होता. तितक्यात भुरा रंग,भावशुन्य डोळे,डोक्यावर वारकरी टोपी,कपाळावर भंडारा फासलेला मुलगा समोर आला. शाळेत जाणारा असेल तर तिसर्या वर्गात असावा. त्यान अनुमती न घेताच हसतच माझ्या कपाळाला हळद लावली. अन् नंतर लागोपाठ भराभर त्यान सगळ्यांची कपाळं पिवळी केली. मी त्याला बोलण्याच्या प्रयत्नात होतो पन तो मात्र चेहर्यावर स्मितहास्य घेवून डावा हात समोर करून उभा. मी त्याच्या हातावर दहा रूपये टेकवले. तो शांतपणे दूरदूर चालत गेला, अन् शेवटी मंदिराच्या दुसर्या बाजूस जात दिसेनासा झाला. मी त्याला शेवटपर्यंत एकटक पहात राह्यलो. एखाद्या कादंबरीकाराण त्याच्या कादंबरीत रहस्यमय कोड टाकाव त्या कोड्यासारखा मला तो वाटला. "खाली जेजूरीतच मस्त रेस्टारंट आहे, जेवून घेवू." प्रव्या बोलला. आम्ही उठून परत निघालो.
दूरवर काळेकुट्ट ढग दिसत होते. कुठेतरी जोरदार पाऊस कोसळत असावा. परश्या-"चला आता लवकर पाऊस यायच्या आत निघू" खरंतर मला पावसात भिजायला खुप आवडत. परश्यालाही आवडत असाव,पन तो थोडा केअरिंग वैगरे वागतो. पन खरच कधीतरी परश्या पन परिणामांची चिंता न करता मुक्तपणे जगेल नक्कीच! आम्ही डोंगर उतरू लागलो. चारही बाजूंना आसमंत बहरला होता. आजूबाजूच गवत कंबरेपर्यंत वाढलेल होत. पाय वाटेच्या दोन्ही बाजूला पाश्चात्य फुलांच्या प्रजातीतली पिवळी फुलं मोहक दिसत होती. वाटेत मधे मधे पाणी साचलेल होत. मजा म्हणून सगळे मुद्दाम त्यात उड्या मारत चालत होते. असे उद्योग केले तर पँट पुर्णपणे फाटून पानउतारा होईल म्हणुन मी सांभाळून पुढ चालत होतो. मात्र परमेश्वराच्या मनात वेगळच, अचानक पावसाने जोर धरला. मग सर्वांसोबत मीही नाईलाजाने धावत सुटलो. 'धावणे इस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पँट फाटणे' अस समिकरण शिकायला अन् अनुभवायला मिळाल.
मी कितीतरी दिवसानंतर असा धावत होतो. मागे आमच्या गावाकडं माझ्या माग कुत्र लागल होतो तेंव्हाच शेवटच धावलो असेल. रोज धावलो असतो तर हे फुगार शरीर तयार झालं नसत. 'देवा रोज एक कुत्रा सोड रे माग म्हणजे जाँगींग तरी होईल'.आज मात्र ढेरेदार पोटासोबत, आनंदाने भरगच्च हुरपुन आलेल मन घेवून धावत होतो. सगळे जोरजोरोत ओरडत धावत होते. हुर्ररे.., मध्येच आयटमची नाव, किंकाळ्या, हशा, अरे पळा..मी पन खुप ओरडलो.
त्या ओरडण्यात मला काहीतरी सांगायच होतं, पन नक्की काय? मलाच कळत नव्हत. मला त्यांना सांगायच होत की, आपण ही मैत्री अशीच जन्मभर टिकवू,जपू. अगदी म्हातारे झालो तरी असेच फिरायला जावू. माझ्या ओरडण्यात मी प्रश्न विचारले, अन् त्यानी त्याच ओरडण्यात प्रेमळ उत्तर दिली. हा असा सगळा शब्दांशिवाय भावनिक संवाद अनुभवला. मला खुप मज्जा आली सगळ्यांबरोबर. माणसाला खरंच कित्ती बोलायच, व्यक्त व्हायचं असतं. म्हणून मी लिहायला लागलो "*एक उनाड दिवस*". हा दिवस जरी संपला त्या दिवशी तरी येणारा प्रत्येक दिवस त्या दिवसाच्या आठवणीन खुप चांगला जातोय....
लव्ह यु..रूषा, सुन्या, परश्या,अभ्या,प्रव्या....😘
: महेश एम माल्गे